Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar Post: ‘…खपवून घेणार नाही’; जितेंद्र आव्हाडांवर टीका करणाऱ्या सहर शेखला रोहित पवारांकडून थेट इशारा

Rohit Pawar Post: ‘…खपवून घेणार नाही’; जितेंद्र आव्हाडांवर टीका करणाऱ्या सहर शेखला रोहित पवारांकडून थेट इशारा

Rohit Pawar Post: गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एआयएम पक्षाच्या मुंब्रा पालिकेतील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडिओत त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खालच्या शब्दांत टीका करताना दिसल्या. यानंतर राजकारण चांगलेच तापले असून, या टीकेला आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar Post) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“अहंकारी लोकांना आम्ही जनतेने कसे हरवले ते पाहिले ना? ज्यांना वाटत होते की आम्ही कोणाच्या तरी उपकारावर आहोत, त्यांच्या अहंकाराच्या चिंधड्या जनतेने उडवल्या आहेत.” अशा शब्दांत सहर शेख (Sahar sheikh) यांनी आव्हाडांना लक्ष केले होते. “निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असली खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही.” असा थेट इशारा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे.

रोहित पवार यांची एक्सवरील पोस्ट

ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कायम शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा जपली, पण काही दिवसांपासून MIM चा स्थानिक उमेदवार आणि त्याच्या नातेवाईकांकडून अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली जाते. निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असली खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही. मुळात निवडणूक लढण्यासाठी MIM ला फंडींग कुठून मिळतं आणि हा पक्ष कुणाची बी टीम म्हणून काम करतो, हे वेगळं सांगायला नको. निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा संबंधितांनी लोकांची कामं करावीत. आम्ही मात्र कायम आव्हाड साहेब यांच्यासोबत आहोत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!