Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘महिला आयोगाचे काम मेकअपसाठी थांब…’; चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रुपाली ठोंबरेंचे पुण्यात आंदोलन

‘महिला आयोगाचे काम मेकअपसाठी थांब…’; चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रुपाली ठोंबरेंचे पुण्यात आंदोलन

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाला आता तीव्र स्वरूप आले आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अवमान झाल्याचा आरोप होत असून, चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बंडखोर गटासह शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात संतप्त आंदोलन करण्यात आले. गुडलक चौक आणि धायरी येथील रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला.

चुकीला माफी नाही, अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आंदोलकांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन निदर्शने केली. यावेळी “महिला आयोगाचे काम मेकअप नाही”, “महिला आयोग का पुरुष आयोग?” अशा आशयाचे व्यंगात्मक फलकही लावण्यात आले. आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या छायाचित्रांना जोडे मारले तसेच काही ठिकाणी त्यांचे पोस्टर आणि फ्लेक्स जाळून निषेध व्यक्त केला.

रुपाली पाटील ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. तर ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या रेखा कोंडे यांनी धायरी येथे निदर्शने आयोजित केली.वरुपाली चाकणकर यांनी फलटण प्रकरणात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आणि तिलाच जबाबदार ठरवले, असा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे महिला आयोगाचे प्रतिष्ठान आणि विश्वसनीयता दोन्ही धोक्यात आल्याचे मत त्यांनी मांडले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवत ,’महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी प्रथम पीडित कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती,’ असे स्पष्ट म्हटले. त्यांनी हेही नमूद केले की, आयोगाचे मत म्हणजे पक्षाचे मत नाही.

या सर्व घडामोडींवर रुपाली चाकणकर यांनी अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. येत्या काही दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने या वादाचे राजकीय पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!