Today मंगळवार, 3rd नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पलाशचा पाय आणखी खोलात! हार्दिक पांड्याच्या EX पत्नीसोबतचा कारमधला ‘तो’ VIDEO व्हायरल

पलाशचा पाय आणखी खोलात! हार्दिक पांड्याच्या EX पत्नीसोबतचा कारमधला ‘तो’ VIDEO व्हायरल

Palash Muchhal Video Natasa Stankovic: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या रिलेशनशिपच्या आणि त्यानंतर लग्नाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होत्या. ठरल्याप्रमाणे दोघांच्या लग्नापूर्वीचे सर्व सोहळे पार पडले, पण बोहोल्यावर चढण्यापूर्वीच काहीतरी घडलं आणि लग्न पुढे ढकललं. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांच्या आजारपणामुळे लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं. पण, नंतर मात्र पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आलं. दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचंही बोललं जातंय. तसेच, सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जातायत. अशातच आता पलाश मुच्छलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पलाश मुच्छलचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हार्दिक पांड्याची एक्स गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविकसोबत दिसतोय. व्हिडीओमध्ये तो नताशासोबत कारमध्ये दिसतोय. हा व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

पलाश, नताशाचा कारमधला ‘तो’ VIDEO व्हायरल

पलाश, नताशाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पलाश मुच्छल नताशासोबत कारमध्ये दिसतोय. व्हिडीओमध्ये पलाश आणि नताशा बादशाहच्या रॅपवर एक रिल बनवतायत. व्हिडीओमध्ये दिसतंय की, पलाश, नताशासोबत कारच्या मागच्या सीटवर बसलाय. तर बादशाहचं रॅप लावून दोघेही रिल शूट करतायत.

मिडिया रिपोर्टनुसार, पलाश आणि नताशाचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. त्यावेळी हार्दिक आणि नताशाचं लग्नही झालेलं नव्हतं. दरम्यान, अद्याप या व्हिडीओबाबत पलाश किंवा नताशा दोघांपैकी कुणीच काही बोललेलं नाही.

लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशची आई काय म्हणालेली?

पलाशच्या आईनं लग्न आणि फसवणुकीबद्दल उघडपणे सांगितलेलं. तिनं सांगितलेलं की, स्मृती आणि पलाशच्या लग्नात कोणतीही फसवणूक झालेली नाही आणि स्मृती मुच्छल कुटुंबाची सून बनण्यास तयार आहे. पलाशची आई म्हणालेली की, “यात कोणतीही फसवणूक झाली नाही. स्मृती मंधाना मुच्छल कुटुंबाची सून होईल…”

पलाशनं स्मृतीला फसवलं?

पलाश मुच्छलच्या चॅटचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आधीच्या डेटिंगच्या अफवा आणि रिलेशनशिप्सबाबतही चर्चांना उधाण आलं आहे. स्मृतीसोबतच्या रिलेशनशिपच्या आधी आणि नंतरही पलाशचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच काय तर, त्यानं त्या मुलींनाही सेम टू सेम स्मृतीसारखंच गुडघ्यावर बसून अंगठी देऊन प्रपोज केल्याचं बोललं जात आहे. पलाशनं आतापर्यंत किती मुलींना डेट केलंय? याचा कच्चाचिठ्ठाच नेटकऱ्यांनी बाहेर काढलाय. अनेकांनी पलाशची बाजू घेतलीय, तर अनेकांनी स्मृती मानधनाला सहानुभूती देऊन पलाशपासून दूर राहण्याचाच सल्ला दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!