Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

National Boxing Championship: राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत निखत झरीन, लव्हलिना बोर्गोहेन आणि जादुमणीची छाप

National Boxing Championship: राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत निखत झरीन, लव्हलिना बोर्गोहेन आणि जादुमणीची छाप

ग्रेटर नोएडा : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीनने प्रदीर्घ दुखापतीनंतर ६० किलो वजनी गटात राष्ट्रिय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून शानदार पुनरागमन केले. त्याचवेळी प्रस्थापित खेळाडू निखत झरीन आणि लव्हलिना बोर्गोहेन यांनीही राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपदे पटकावली.

सर्विसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने (एसएससीबी) पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी पुरुषांच्या गटातील नऊ पदकांसह एकूण १२ सुवर्णपदके जिंकली, ज्यामुळे विविध वजनी गटांमध्ये पुन्हा एकदा सेनादलाच्या बॉक्सिंग खेळाडूंची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अर्थात वारंवार होणारे संघटनात्मक वाद आणि पंचांच्या सदोष कामगिरीने स्पर्धेत वारंवार वादाची परिस्थिती निर्माण झाली. याला हुसामुद्दिन आणि सचिन सिवस यांच्यातील अंतिम लढतही अपवाद ठरली नाही.

दुखापतीमुळे अनेक महिने खेळापासून दूर राहिलेल्या हुसामुद्दीनने चिवट कामगिरी करत अंतिम फेरीत आपलाच सहकारी गतविजेता सचिन सिवाचचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. हुसामुद्दीनने सुरुवातीची पिछाडी भरून काढत उत्कृष्ट ठोशांची निवड आणि रिंगवरील नियंत्रणाच्या जोरावर ही लढत जज्जेसचा ३-२ असा निसटता कौल मिळवत जिंकली. सेनादलाच्या ३१ वर्षीय हुसामुद्दीनने सावध सुरुवात केली आणि पहिल्या फेरीत तरुण सचिनला वर्चस्व गाजवू दिले, परंतु हळूहळू त्याने अधिक अचूक ठोशांचे संयोजन आणि प्रतिहल्ले करून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले.

सामन्याच्या शेवटी काही काळ गोंधळ निर्माण झाला, जेव्हा सुरुवातीला निकाल सचिनच्या बाजूने जाहीर करण्यात आला, परंतु काही क्षणांनंतर तो दुरुस्त करण्यात आला. “हे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते, कारण या वर्षी अनेक स्पर्धा होणार आहेत. दुखापतीनंतर, मी हे अजूनही करू शकतो हे स्वतःला आणि इतरांना सिद्ध करुन दाखवण्याची गरज होती,” असे भावनिक झालेल्या हुसामुद्दीनने विजयानंतर सांगितले.

जादुमणीची जादू

या स्पर्धेत सेादलाच्या जादुमणी सिंग याची कामगिरी लक्षवेधक ठरली. जादुमणीने ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून आपल्या स्वप्नवत कामगिरीची सांगता केली आणि नंतर त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष बॉक्सर म्हणून निवडण्यात आले. या २१ वर्षीय मणिपुरी खेळाडूने, उपांत्य फेरीत दोन वेळा ऑलिम्पियन आणि २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पंघालचा पराभव केला होता, त्याने सहकारी पवन बर्तवालविरुद्धच्या शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक अंतिम फेरीत उल्लेखनीय संयम आणि तग दाखवत विजय मिळवला.

सेनादलाच्या कारण आदित्य प्रतापने ६५ किलो गटाच्या अंतिम फेरीत हिमाचल प्रदेशच्या गतविजेत्या अभिनव जामवालचा ३-२ असा पराभव करून मोठा उलटफेर घडवला. जामवाल गेल्या वर्षी सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता, त्याने विश्वचषकात तीन रौप्य पदके जिंकली होती.

निखत, लव्हलिनाचे वर्चस्व

महिलांच्या स्पर्धेत, तेलंगणाच्या निखतने ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत २०२३ च्या विश्वविजेत्या हरियाणाच्या नीतू घंघासचा एकतर्फी लढतीत पराभव करून आपले तिसरे राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले. टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिनाही तितकीच प्रभावी ठरली, तिने ७५ किलो गटाचे विजेतेपद पटकावण्यासाठी रेल्वेच्या सनमाचा चानूचा ५-० असा पराभव केला. गतवर्षात बहुतेक काळ स्पर्धेपासून दूर राहिल्यानंतर, ही दोन्ही विजेतेपदे निखत आणि लव्हलिनाच्या आत्मविश्वासाला बळ देतील, कारण या वर्षात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत.

“मी नवीन वर्षाची सुरुवात विजेती म्हणून केली आहे, हे खूप छान आहे. माझी आजची प्रतिस्पर्धी स्वतः एक विश्वविजेती होती, त्यामुळे स्पर्धा खूप कठीण होती. अशा दर्जेदार मुष्टियोद्धांविरुद्ध जिंकल्याने माझा आत्मविश्वास वाढला,” असे निखत म्हणाली.

अखिल भारतीय पोलिसांची विद्यमान विश्वविजेती मीनाक्षी हुडा (४८ किलो) हिने अपेक्षेप्रमाणेच आणखी एक प्रभावी सुवर्णपदक जिंकले, तर सर्व्हिसेसची आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रीती पवारने ५४ किलो गटाचे विजेतेपद पटकावले आणि तिला स्पर्धेतील सर्वोत्तम महिला मुष्टियोद्धा म्हणून गौरवण्यात आले.

हरियाणाची अनुभवी मुष्टियोद्धा पूजा राणीने ८० किलो गटाच्या अंतिम फेरीत आपल्याच राज्यातील नैनाचा ५-० असा पराभव करून आपले १० वे राष्ट्रीय अजिंक्यपद सुवर्णपदक जिंकून आपल्या गौरवशाली कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला.

इतर सुवर्णपदक विजेत्यांमध्ये रेल्वेच्या प्राची (५७ किलो), प्रिया (६० किलो) आणि अल्फिया खान (८०+ किलो), तसेच सर्व्हिसेसच्या प्रांजल यादव (६५ किलो) आणि अरुंधती चौधरी (७० किलो) यांचा समावेश होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!