Today मंगळवार, 3rd नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

T20 World Cup 2026: आपल्याला वगळले जाण्याची गिलला कल्पनाच नव्हती!

T20 World Cup 2026: आपल्याला वगळले जाण्याची गिलला कल्पनाच नव्हती!

T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील लखनऊ येथील सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला. त्याचवेळी संघ व्यवस्थापनेच्या झालेल्या बैठकीत टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभमन गिलला वगळण्याचा निर्णय झाला. मात्र, ड्रेसिंगरुमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावापायी त्याच्यापर्यंत पोहचलाच नाही.

धुक्यामुळे रद्द झालेल्या सामन्यात बीसीसीआयच्या नियोजन समितीवर टिका सुरु झाली. त्याचवेळी दुसरीकडे संघाच्या ड्रेसिंगरुमधील वातावरणावर अविश्वासाचे ढग दिसून आले. सामना सुरु करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरु असताना, बीसीसीआय पदाधिकारी, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, संघ व्यवस्थापन वेगळ्याच नियोजनात गर्क होते. त्या बैठकीतच अलिकडच्या काळातील अपयशी कामगिरीमुळे शुभमन गिलला वगळण्याचा निर्णय झाला. मुंबईत शनिवारी झालेली बैठक ही केवळ औपचारिकता होती. पण, वगळले जाणार असल्याची कल्पाना कर्णधार सुर्यकुमार यादव, प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, सचिव देवजित सैकिया यांच्यापैकी कुणीच गिलला दिली नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार असलेल्या खेळाडूची इतकी मोठी थट्टा झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे.

गौतम गंभीर यांनी प्रशिक्षक आणि अजित आगरकर यांनी निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून भारतीय संघातील वातावरण खराब होऊ लागले आहे. एकही संघ निवड अपेक्षितपणे पार पडलेली नाही. विशेष म्हणजे कर्णधार सुर्यकुमार स्वतः चांगल्या लयीत नसताना त्याला का वगळण्यात आले नाही, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्चेत आला आहे. गिलला वगळताना तो शंभर टक्के तंदुरुस्त नसल्याची पळवाट निवड समितीने शोधून काढली आणि सुर्यकुमारचे नेतृत्व कौशल्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत गिल गुणी फलंदाज आहे. पण, सध्या त्याच्याकडून धावा होत नाहीत असे सांगितले. त्या वेळी सुर्यकुमारही दोन आकड्यातही पोहचत नसल्याचे ते विसरुन गेले. गिलने २०२५ मध्ये १५ डावांत १३७पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने २९१ धावा केल्या आहेत. तर सुर्यकुमारने १९ डावांत १३२.२च्या स्ट्राइकरेटने केवळ २१८ धावा केल्या आहेत. ही आकडेवारी देखिल निवड समिती समजून घेऊ शकली नाही.
या अनपेक्षित निर्णयानंतर आता कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी कर्णधार असलेला गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांच्यात कितपत सलोखा राहिल हा प्रश्नच आहे. एकप्रकारचे अविश्वासाचे ढग भारतीय ड्रेसिंगरुमध्ये घोंघावत आहेत. प्रशिक्षक गंभीर यांची रणनिती आणि काम करण्याची पद्धत लक्षात घेता आज गिल झाला, उद्या हीचवेळ सुर्यकुमारवर यायला वेगळ लागणार नाही या चर्चेनेही जोर धरला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!