Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Instagram वर येतंय नवीन फीचर; आता Edit करता येणार कमेंट्स

Instagram वर येतंय नवीन फीचर; आता Edit करता येणार कमेंट्स

नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची युजर्स संख्या जास्त आहे. त्यानुसार, कंपन्यांकडूनही अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यात आता इन्स्टाग्रामने एक बहुप्रतिक्षित फीचर लाँच केले आहे. हे नवीन फीचर युजर्संना आणि क्रिएटर्सना त्यांच्या कमेंट्स पोस्ट केल्यानंतर त्या स्वतः एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे.

अनेकदा पोस्टवर चुकून चुकीच्या कमेंट्स केल्या जातात. मात्र, आता इन्स्टाग्रामचे हे नवीन फीचर ही चूक दुरुस्त करण्याची सविधा देणार आहे. युजर्सला टायपिंगमधील चुका किंवा इतर चुका दुरुस्त करू शकतात. इन्स्टाग्रामने लाँच केलेले हे फीचर फक्त १५ मिनिटांसाठी काम करेल. याचा अर्थ, वापरकर्ते कमेंट्स पोस्ट केल्याच्या १५ मिनिटांच्या आत त्या एडिट करू शकतील. इन्स्टाग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवर पारदर्शकता राखण्यासाठी एडिट टॅगचा वापर करते. जर कोणत्याही युजर्सने आपली कमेंट एडिट केली, तर इतरांना ती कमेंट एडिट झाली आहे हे दिसले पाहिजे.

कमेंट अपडेट करण्यासाठी नियमावली काय?

– कमेंट एडिट करण्यासाठी १५ मिनिटांची वेळमर्यादा असेल.
– कमेंट्समध्ये अमर्यादित बदल करणे शक्य होईल.
– एडिट फीचर फक्त टेक्स्टसाठी लागू होते.
– जर कमेंटमध्ये फोटो असेल, तर तो एडिट करता येणार नाही.
– एडिट केलेल्या कमेंटवर एडिट टॅग दिसेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!