Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Airtel चे नेटवर्क आठवड्यात दुसऱ्यांदा डाउन; हजारो ग्राहकांना बसला मोठा फटका

Airtel चे नेटवर्क आठवड्यात दुसऱ्यांदा डाउन; हजारो ग्राहकांना बसला मोठा फटका

नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या कार्यरत आहेत. त्यात भारती एअरटेलच्या नेटवर्कमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याचे समोर आले आहे. एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. यावेळी सर्वात मोठा फटका हा बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून आला.

दिल्ली-एनसीआरमध्ये एअरटेल आणि जिओचे नेटवर्क डाउन झाले होते. ज्यामुळे कॉल, एसएमएस आणि इंटरनेट सारख्या सेवा विस्कळीत झाल्या होत्या. दुपारी 12.15 च्या सुमारास ही अडचण जाणवू लागली. त्यानंतर ग्राहकांकडून तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत होता. तब्बल 7100 पेक्षा अधिक ग्राहकांनी एअरटेल नेटवर्क डाउन असल्याची समस्या नोंदवली. कंपनीने त्याला तात्पुरती कनेक्टिव्हिटी समस्या असे म्हटले होते.

कंपनीकडून युजर्सना मोबाईल फोन रीस्टार्ट करण्याचा सल्लाही दिला. एअरटेलने ट्विट केले, ‘गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ही समस्या तात्पुरत्या कनेक्टिव्हिटी व्यत्ययामुळे आहे आणि सुमारे एका तासात ती दूर होईल. त्यानंतर कृपया तुमचा मोबाईल रीस्टार्ट करा’.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!