Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

2026 मध्ये Apple चा पहिला फोल्डेबल फोन होणार लाँच; ‘हे’ फीचर्स वेधतील लक्ष…

2026 मध्ये Apple चा पहिला फोल्डेबल फोन होणार लाँच; ‘हे’ फीचर्स वेधतील लक्ष…

नवी दिल्ली : जगभरात Apple चे कोट्यवधी चाहते आहेत. यातील अनेक चाहते अॅपलच्या फोल्डेबल आयफोनची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. जरी सॅमसंग या क्षेत्रात नंबर वन असला तरी, यवर्षी मात्र चित्र बदलू शकते. कारण, अॅपल यावर्षी आयफोन फोल्ड लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने फोल्डबद्दल कोणतीही माहिती अद्याप दिली नाही.

सध्या अॅपलवर एक स्लीम फोल्डेबल फोन लाँच करण्याची मागणी वाढत आहे. म्हणून, कंपनी फोल्डेबल फोन स्लीम करण्यासाठी फेस आयडी काढून टाकू शकते. या फोनमध्ये ऑथेंटिकेशनसाठी टच आयडी असू शकतो. अॅपल त्याच्या फोल्डसाठी टायटॅनियम आणि स्टेनलेस स्टीलचे धातू वापरू शकते. या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो. प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सल असू शकतो आणि प्रायमरी डिस्प्लेवर अंडर-डिस्प्ले कॅमेरा ठेवला जाणार आहे.

२०२६ हे अॅपलच्या इतिहासातील एक मोठे वर्ष असू शकते. कारण या वर्षी, कंपनी केवळ फोल्डेबलच नाही तर एआय ग्लासेस देखील लाँच करू शकते. Apple च्या AI चष्म्यांचे प्रोटोटाइप यापूर्वीही पाहिले गेले आहेत आणि काही लीक्स देखील समोर आले आहेत. या आयफोन फोल्डमध्ये ५.२५ इंचाचा कव्हर स्क्रीन असेल, तर अंतर्गत डिस्प्ले ७.६ इंचाचा असेल. दोन्ही AMOLED पॅनल असतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!