Today रविवार, 27th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता Gmail मध्येही WhatsApp सारखेच फीचर; एका क्लिकने होईल संपूर्ण काम

आता Gmail मध्येही WhatsApp सारखेच फीचर; एका क्लिकने होईल संपूर्ण काम

नवी दिल्ली : सध्या मेल पाठवण्यासाठी असो वा प्राप्त करून घेण्यासाठी बहुतांश लोक गुगलच्या Gmail चा वापर करताना दिसत आहेत. आपल्या युजर्सच्या दृष्टीने गुगलकडून अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यातच Gmail युजर्संना कंपनीकडून एक बेस्ट फीचर्स देण्यात येत आहे.

आता Gmail मध्येही WhatsApp सारखेच फीचर येत आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट मिळणार आहे. हा सपोर्ट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे. इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवरही एंड-टू-एंड एन्क्रिप्शन उपलब्ध आहे. एकदा हे अपडेट उपलब्ध झाल्यावर, युजर्सना संवेदनशील ई-मेल पाठवण्यासाठी सुरक्षेची लेव्हल करण्याकरिता वेगळ्या सॉफ्टवेअर किंवा एक्सटेंशनची गरज भासणार नाही. ई-मेल युजर्सपर्यंत सुरक्षितपणे पोहोचतील.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय?

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हे मूलतः एक प्रकारचे डिजिटल सुरक्षा लॉक सिस्टीम आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून, पाठवणारा आणि प्राप्तकर्ता यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही ई-मेल किंवा मेसेज डीकोड करू शकणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही सोने आणि चांदी असलेला एक बॉक्स पाठवता. काही लोक त्याला कुलूप लावतात आणि फक्त प्राप्तकर्त्याकडेच त्याची चावी असते. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन याच प्रकारे काम करते.

‘या’ युजर्संना होणार फायदा…

क्लायंट-साइड एनक्रिप्शन क्षमता असलेल्या गूगल वर्कस्पेसच्या एंटरप्राइझ वापरकर्त्यांसाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन उपलब्ध होईल. युजर्संना ते ॲक्सेस करण्यापूर्वी, ॲडमिन कन्सोलद्वारे अँड्रॉइड आणि आयओएस सपोर्ट सक्रिय करणे आवश्यक आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!