नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात आता फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतात त्यांचा सेकंड-जनरेशन रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. नवीन मॉडेलमध्ये जनरेशन 1 मॉडेलच्या तुलनेत व्हिडिओ क्षमता सुधारल्या आहेत, बॅटरी बॅकअपही चांगला मिळत आहे. यात AI फीचर्सही अपग्रेड केली आहेत.
या ग्लासेसमध्ये कॅमेरा, स्पीकर आणि भविष्यात UPI लाईट समाविष्ट असणार आहे. एकदा हे फीचर्स एकत्रित झाल्यानंतर, रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस वापरून पेमेंट करणे शक्य होईल. युजर्संना फक्त स्मार्ट चष्मे घालावे लागतील, QR कोड पाहावा लागेल आणि नंतर हे मेटा, ‘स्कॅन अँड मेक अ पेमेंट’ असे म्हणावे लागेल. त्यानंतर पेमेंट प्रक्रिया केली जाईल. रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस वापरून पेमेंट करण्यासाठी युजर्संनी त्यांचे बँक खाते व्हॉट्सअॅप UPI शी लिंक केले पाहिजे. या फीचर्सबद्दल अधिक तपशील येत्या काही दिवसांत शेअर केले जातील, अशी माहिती दिली जात आहे.
रे-बॅन मेटा (जनरल २) चष्म्यांमधील हार्डवेअरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन मॉडेलसह, युजर्संना स्ट्राँग ३के अल्ट्रा एचडी व्हिडिओ कॅप्चर करू शकतील आणि अल्ट्रा वाईड एचडीआरला सपोर्ट करू शकतील, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ गुणवत्ता सुधारेल. त्यात बॅटरी सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्सना एका चार्जवर ८ तासांची बॅटरी लाईफ मिळू शकणार आहे.


