नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स उपलब्ध आहेत. त्यात जर तुम्ही हेडफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तरीही हेडफोन घेता येऊ शकते. JBL TUNE 760NC हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. हे हेडफोन्स अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीने हे हेडफोन्स 7999 मध्ये लाँच केले आहेत.
JBL TUNE 760NC सध्या Amazon वर 3499 मध्ये लिस्टेड आहे. यातून 56% सवलत मिळत आहे. तुम्ही बँक ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकता. या हेडफोन्समध्ये JBL चा प्युअर बास साउंड आणि शक्तिशाली अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आहे. याचा अर्थ हेडफोन वापरताना तुमचे लक्ष विचलित होणार नाही. JBL हेडफोन्समध्ये दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. एका चार्जवर 50 तासांपर्यंत प्लेटाइम मिळू शकतो. यामध्ये ब्लूटूथ 5 आहे, त्यामुळे तुम्हाला कनेक्टिव्हिटीची काळजी करण्याची गरज नाही.
हे हेडफोन लाईट वेट आहेत. यात कम्फर्टेबल इअरपॅड आहेत. यामुळे प्रवास करताना वापरण्यासाठी योग्य आहेत. हे मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देखील देते, ज्यामुळे तुम्हाला एकाच वेळी अनेक डिव्हाइस कनेक्ट करता येणार आहे. याची किमतही कमी असल्याने तुम्ही ते अगदी सहजपणे खरेदी करू शकता.


