नवी दिल्ली : सध्या अनेक टेक्नॉलॉजी उदयास येत आहे. त्यात स्मार्टफोन म्हटलं की त्याला इंटरनेट गरजेचे असते. त्यात Apple कडून नवीन iPhone सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी दिली जात आहे. नेटवर्क नसलेल्या आपत्कालीन परिस्थितीत ते वापरले जाते. असे जरी असले तरी ते अद्याप प्रत्येक देशात उपलब्ध नाही. कंपनीकडून यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Apple आगामी iPhone 18 Pro मालिकेत एक नवीन सॅटेलाईट-कनेक्टिव्हिटी फीचर जोडण्यावर काम करत आहे. भविष्यातील iPhone Starlink सॅटेलाइट नेटवर्कशी थेट कनेक्ट होऊ शकतील आणि डेटा कनेक्शन स्थापित करू शकतील. Starlink ही एक उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा आहे. ही कंपनी अब्जाधीश एलोन मस्क यांच्या मालकीची आहे आणि भारतात आधीच त्याची चाचणी घेतली जात आहे. अलीकडेच वेबसाइट्सवर प्लॅन्स दिसले होते. परंतु, नंतर असे जाहीर करण्यात आले की प्लॅन्स नंतर उपलब्ध होतील. भारतातील लोक ते कधी वापरू शकतील हे स्पष्ट नाही.
आतापर्यंत, ही माहिती केवळ रिपोर्ट आणि उद्योग सोर्सकडून आधारित आहे. अॅपलने अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही. Apple आधीच iPhone मध्ये सॅटेलाइट फीचर्स देते, परंतु मर्यादांसह हे मिळत आहे.


