नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या ४८ व्या एजीएममध्ये, जिओने एकाच वेळी अनेक नवीन तंत्रज्ञान लाँच केले. त्यापैकी सर्वात खास म्हणजे व्हॉइस-बेसड्स सर्च असिस्टंट RIYA जो जिओ फ्रेम्स आणि पीसीसह लाँच करण्यात आला.
नवीन असिस्टंट रियाच्या मदतीने, युजर्स आता फक्त व्हॉइस कमांड देऊन कंटेंट शोधू शकतील. हे टूल अतिशय जलद आणि सोप्या पद्धतीने निकाल दाखवते, ज्यामुळे युजर्संचा वेळ वाचू शकेल आणि त्यांना एक सहज डिजिटल अनुभव मिळेल. एजीएममध्ये, जिओने व्हॉईस प्रिंट फीचर देखील आणले आहे. जे विशेषतः क्रीडा आणि मनोरंजन प्रेमींसाठी आहे. हे फीचर वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या भारतीय भाषेत कंटेंट पाहण्याचा पर्याय देते.
हे फीचर खास का आहे?
भारतातील भाषिक विविधता लक्षात घेऊन हे डिझाइन करण्यात आले आहे. जिओच्या माहितीनुसार, व्हॉइस प्रिंटसह कंटेंट अनुभव खूप स्थानिक आणि वैयक्तिक वाटेल. तो एक रोमांचक क्रिकेट सामना असो किंवा ब्लॉकबस्टर चित्रपट, युजर्स तो त्यांच्या स्वतःच्या भाषेत पाहू शकतील. यामुळे डिजिटल मनोरंजनाचा अनुभव आणखी वास्तविक होऊ शकेल.
भारतीय प्रेक्षकांसाठी एक मोठे पाऊल
भारतीय भाषांच्या कोट्यवधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने जिओचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. देशभरातील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या युजर्सदेखील समान तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा यावर कंपनीचे लक्ष आहे.


