Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jio चा लॅपटॉप आता आणखी झाला स्वस्त; तुम्हालाही परवडणार, किंमत फक्त…

Jio चा लॅपटॉप आता आणखी झाला स्वस्त; तुम्हालाही परवडणार, किंमत फक्त…

नवी दिल्ली : जर तुम्ही कमी बजेटमध्ये लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर रिलायन्स जिओकडे एक चांगला पर्याय देण्यात आला आहे. कंपनीने JioBook लाँच केला आहे. हा लॅपटॉप १६४९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला गेला आहे. आता, हा लॅपटॉप काही हजार रुपयांच्या सवलतीत उपलब्ध असणार आहे. जिओबुक सध्या अमेझॉनवर १२४९० मध्ये लिस्टेड झाला आहे.

जिओच्या लॅपटॉपवर तुम्हाला ४००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. हा लॅपटॉप तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकणार आहे. याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा लॅपटॉप खरेदी करताना १५०० ची बँक ऑफर देखील मिळत आहे. तुम्ही हा लॅपटॉप No Cost EMI वर देखील खरेदी करू शकता. JioBook मध्ये ११.६-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईस ४G LTE सपोर्टसह मिळत आहे. म्हणजेच तुम्ही सिम कार्ड घालू शकता. तुम्हाला इंटरनेट अॅक्सेससाठी वाय-फाय किंवा इतर कोणत्याही डेटा डिव्हाईसवर अवलंबून राहावे लागणार नाही.

JioBook मध्ये एक्सटेंडेड डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. तुम्ही त्यावर अँड्रॉइड अॅप्स वापरू शकता. या लॅपटॉपमध्ये ऑक्टा-कोर Mediatek MT 8788 प्रोसेसरही असणार आहे. हा डिव्हाइस 4GB LPDDR4 रॅम आणि 64GB स्टोरेजसह मिळत आहे. यात MicroSD Card वापरून स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. हा लॅपटॉप मल्टी-विंडो सपोर्ट, नेटिव्ह अॅप्स आणि थर्ड-पार्टी अॅप सपोर्ट करतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!