Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Lyne ने लाँच केले बजेटमधील ब्लूटूथ कॉलिंग वॉच; कॉल रेकॉर्डिंग फीचरही मिळतंय

Lyne ने लाँच केले बजेटमधील ब्लूटूथ कॉलिंग वॉच; कॉल रेकॉर्डिंग फीचरही मिळतंय

नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात Lyne या कंपनीने त्यांचा स्मार्ट वेअरेबल पोर्टफोलिओ वाढवला आहे. कंपनीने त्यांचे स्मार्टवॉच, लाईन लान्सर १९ प्रो लाँच केला आहे. हे गॅजेट्स कमी किमतीत शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहे. यामध्ये ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटी मिळत आहे. ज्यामुळे युजर्सला या वॉचच्या माध्यमातून थेट कॉल करता येणार आहे.

Lyne च्या या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटरिंग आहे. ते अनेक स्पोर्ट्स मोड्स देते. हे वॉच IPX4 रेटिंगसह येते आणि एका चार्जवर १२ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळत आहे. कंपनीने लाईन लान्सर १९ प्रो १२९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केले. तुम्ही हे वॉच प्रमुख ऑफलाईन रिटेल आउटलेटमधून खरेदी करू शकता. ते सध्या ऑनलाईन उपलब्ध नसले तरी कमी किमतीत स्मार्ट फीचर्स शोधणाऱ्यांसाठी हे वॉच एक चांगला पर्याय असू शकते. या बजेटमध्ये, boAt, Noise आणि इतर अनेक ब्रँडचे पर्याय देखील आहेत.

Lyne Lancer १९ Pro मध्ये २.०१ इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. हे वॉच ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटीसह येते. ते iOS १२ किंवा त्यावरील आणि अँड्रॉइड ९ किंवा त्यावरील व्हर्जनसाठी बेस्ट असे आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही कॉल करू आणि घेऊ शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!