नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Nothing ने आपला नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. Nothing A3 Lite भारतात लाँच झाला आहे. हा Nothing चा मिड-रेंज डिव्हाईस असून, जो कंपनीने अलीकडेच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रो प्रोसेसरसह मिळत आहे.
Nothing च्या या फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये, कंपनीने त्याच्या सिग्नेचर ग्लिफ इंटरफेसला फक्त अलर्ट लाईटने बदलले आहे. कंपनीने त्याचे नाव ग्लिफ लाईट ठेवले आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. या फोनमध्ये ६.७७-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असून, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनची पीक ब्राइटनेस ३००० निट्स आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी पांडा ग्लास वापरला जातो. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रो प्रोसेसर मिळत आहे.
Nothing हा फोन Android 15 वर आधारित Nothing OS ३.५ वर चालतो. यात हायब्रिड ड्युअल सिम स्लॉट आहे, म्हणजेच तुम्ही दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मायक्रोएसडी कार्ड वापरू शकता. हँडसेटमध्ये 50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.


