नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने भारतात आपला फ्लॅगशिप मोबाईल फोन लाँच केला आहे. OnePlus 15 5G असे या फोनचे नाव आहे. या फोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. क्वालकॉमचा सर्वात शक्तिशाली फ्लॅगशिप प्रोसेसर आहे.
OnePlus 15 5G मध्ये 7300mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने स्वतः याबाबतची माहिती X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. OnePlus 15 5G भारतात गुरुवारी संध्याकाळी लाँच करण्यात आला. OnePlus च्या अधिकृत वेबसाइट आणि YouTube चॅनेलवर हा कार्यक्रम झाला. लाँच झाल्यानंतर लगेचच, रात्री 8 वाजता Amazon India आणि अधिकृत OnePlus India वेबसाइटद्वारे विक्री सुरू झाली. OnePlus 15 5G च्या किमती त्याच्या लाँचपूर्वी लीक झाल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्समध्ये 12GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजची सुरुवातीची किंमत 72999 असल्याचा दावा केला आहे.
OnePlus 13 हा स्मार्टफोन 69999 मध्ये लाँच करण्यात आला. क्वालकॉमने आधीच दावा केला आहे की, त्यांचा नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर, स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5, हा कंपनीचा सर्वात शक्तिशाली मोबाईल चिपसेट आहे. येत्या काही दिवसांत हा प्रोसेसर इतर फोनमध्ये उपलब्ध होईल. OnePlus 15 चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. चिनी व्हेरिएंटमध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा BOE X3 8T LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे.


