नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात Realme ने नवे Realme 16 Pro+ 5G आणि Realme 16 Pro हे दोन फोन भारतात लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन शक्तिशाली फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेऱ्यांसह मिळत आहेत. कंपनीने या सीरीजमध्ये कॅमेऱ्यावर जास्त लक्ष दिले आहे. Pro+ मध्ये टेलिफोटो लेन्स आहे, तर Pro मध्ये २००MP मुख्य कॅमेरा दिला गेला आहे.
स्मार्टफोन AMOLED डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसरसह मिळत आहे. दोन्ही फोनमध्ये २००MP रियर कॅमेरा आणि ५०MP सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. Realme 16 Pro 5G ची सुरुवात ३१९९९ पासून होते. ही किंमत ८GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर ८GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३३९९९ आहे. १२GB RAM + २५६GB स्टोरेज या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत ३६९९९ रुपये आहे. Realme 16 Pro+ 5G हा फोन 8GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९९९९ रुपये आहे.
तसेच ८GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४१९९९ रुपये आहे. Realme 16 Pro मध्ये १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. तो मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रोसेसर दिला गेला आहे. यात २००MP मेन लेन्स आणि ८MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. ५०MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये ७००० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.


