नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक फीचर्सही यामध्ये देण्यात येत आहेत. त्यात आता Realme कंपनी भारतात एक नवीन स्मार्टफोन, Realme 16 5G लाँच करत आहे. कंपनीने आपल्या अधिकृत पोर्टलवर या फोनची माहिती दिली. हा फोन भारतात २ एप्रिलला लाँच केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
Realme 16 5G हा भारतातील पहिला सेल्फी मिरर फोन आहे. यात मागील पॅनलवरील कॅमेरा सेन्सरजवळ एक मिरर असणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना मागील कॅमेरा सेटअप वापरून सेल्फी घेता येतात. रियलमी इंडियाच्या अधिकृत पोर्टलने आगामी हँडसेटबद्दल काही तपशील शेअर केले आहेत, ज्यात त्याचा कॅमेरा, डिझाइन, डिस्प्ले आणि आयपी रेटिंग यांचा समावेश आहे. Realme 16 मध्ये ६.५७-इंचाचा डिस्प्ले असून, त्याचे वजन १८३ ग्रॅम आहे. कंपनी हा हँडसेट एअर व्हाइट आणि एअर ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये आणत आहे.
Realme 16 मध्ये ७०००mAh बॅटरी असेल आणि सोबत ६०W फास्ट चार्जर मिळेल. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या फोनला तीन वर्षांचे अँड्रॉइड ओएस अपडेट्स आणि चार वर्षांचे अँड्रॉइड सुरक्षा अपडेट्स मिळणार असल्याचे सांगितले.


