Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Reliance Jio ची बेस्ट ऑफर; 35000 रुपयांच्या सेवा मिळत आहेत मोफत, Gemini AI Pro…

Reliance Jio ची बेस्ट ऑफर; 35000 रुपयांच्या सेवा मिळत आहेत मोफत, Gemini AI Pro…

नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून ग्राहकांना सुविधा दिली जाते. त्यात एअरटेलनंतर, जिओ देखील मोफत एआय सबस्क्रिप्शन देत आहे. एअरटेलने त्यांच्या मोफत सबस्क्रिप्शनसाठी पर्प्लेक्सिटी प्रो एआय निवडले आहे, तर जिओ त्यांच्या ग्राहकांना जेमिनी एआय प्रो प्लॅनचा ऍक्सेस देत आहे. हा ऍक्सेस १८ महिन्यांसाठी मोफत असणार आहे.

Gemini AI Pro सबस्क्रिप्शनची किंमत ३५१०० रुपये आहे आणि ती जिओ सबस्क्रिप्शनसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. जिओ सुरुवातीला १८ ते २५ वयोगटातील युजर्संना ऍक्सेस देणार आहे. नंतर, ती इतर युजर्ससाठी विस्तारित केली जाईल. ही ऑफर ३० ऑक्टोबरपासून सुरू होते. सुरुवातीला, १८ ते २५ वयोगटातील युजर्स पात्र असतील. युजर्सकडे ३४९ रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचा Unlimited 5G रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे. ही सुविधा प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला myJio App वर जावे लागेल. होमपेजवर तुम्हाला Claim Now चा बॅनर दिसेल. त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला Gemini AI Pro चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. Gemini AI Pro सबस्क्रिप्शन अंतर्गत, युजर्संना जेमिनी २.५ प्रो चे मोफत अॅक्सेस मिळेल. याव्यतिरिक्त, २TB पर्यंत क्लाउड स्टोरेज उपलब्ध आहे. तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ आणि इतर कागदपत्रे क्लाउडवर स्टोअर करू शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!