Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Foldable Phone ची सर्वात मोठी समस्या संपली; Samsung आणतोय क्रीज-फ्री फोल्डेबल फोन

Foldable Phone ची सर्वात मोठी समस्या संपली; Samsung आणतोय क्रीज-फ्री फोल्डेबल फोन

नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक स्मार्टफोन, गॅजेट्स आणले जात आहेत. त्यात Apple ने कदाचित अद्याप फोल्डेबल फोन लाँच केलेला नसेल. सॅमसंग अनेक वर्षांपासून फोल्डेबल स्पेसमध्ये मार्केट लीडर आहे आणि सध्याचा Fold 7 हा जगातील सर्वात स्लीम फोल्डेबल फोन मानला जातो.

कंपनीने क्रीजकडे लक्ष दिले नाही आणि तो अजूनही दिसत आहे. मात्र, आता सॅमसंगच्या झेड फोल्ड सीरीजने फोल्डेबल कॅटेगरी आणली आहे. मात्र, क्रीज ही या तंत्रज्ञानाची एक मोठी मर्यादा राहिली. आता, २०२६ मध्ये, सॅमसंग ती मर्यादा तोडण्याची तयारी करत आहे. याची एक झलक CES २०२६ मध्ये दिसली. CES मध्ये, सॅमसंग डिस्प्लेने एक नवीन फोल्डेबल OLED स्क्रीन लाँच केली, ज्याला उद्योग क्रीज-लेस पॅनेल म्हणतो. यात जेव्हा स्क्रीन पूर्णपणे उघडली गेली तेव्हा मध्य रेषा जवळजवळ अदृश्य होती.

जुन्या फोल्डेबल डिस्प्लेमध्ये स्क्रीनखाली प्लास्टिक-आधारित एक लेव्हल होती. जेव्हा फोन फोल्ड केला जात होता तेव्हा सर्व प्रेशर एका स्लीम रेषेवर केंद्रित होता. म्हणूनच फोल्डच्या मध्यभागी क्रीज नेहमीच दिसत होता. मात्र, नवीन फोल्डेबल डिस्प्ले तंत्रज्ञानात, सॅमसंगने खाली एक मेटल सपोर्ट प्लेट आणि एक नवीन मल्टी-लेयर स्ट्रक्चर जोडले आहे. याचा फायदा असा आहे की फोल्डिंग करताना, दाब एकाच रेषेवर केंद्रित होत नाही, तर संपूर्ण थरात पसरतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!