नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Samsung आता फोल्ड सेगमेंटचा विस्तार करत आहे. त्यानंतर कंपनी ट्राय फोल्ड फोन म्हणजेच सॅमसंग गॅलेक्सी ट्राय फोल्ड स्मार्टफोन लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन्ससह कंपनी त्यांच्या इतर दोन प्रॉडक्ट्सचे लाँचिंग करणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.
Samsung च्या अहवालानुसार, सॅमसंग 29 नोव्हेंबर दक्षिण कोरियामध्ये एक इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटदरम्यान, तीन डिव्हाईस लाँच केले जाऊ शकतात, ज्यामध्ये सॅमसंग ट्राय फोल्ड फोन, एक्सआर हेडसेट (कोडनेम प्रोजेक्ट मोहन) आणि एआय ग्लासेस यांचा समावेश असेल. सॅमसंग ट्राय फोल्ड फोनबद्दलच्या माहितीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. ट्राय फोल्ड फोन अंतर्गत, डिस्प्ले दोनदा फोल्ड करता येतो आणि सॅमसंगच्या सध्याच्या फोल्ड फोनचा डिस्प्ले फक्त एकदाच फोल्ड करता येतो.
Huawei च्या स्मार्टफोनला टक्कर देण्याची शक्यता
सॅमसंग ट्राय फोल्ड स्मार्टफोन हुआवे मेट एक्सटी अल्टिमेटला टक्कर देऊ शकेल. हा स्मार्टफोन यापूर्वीच लाँच झाला आहे. रिपोर्टनुसार, आता सॅमसंग लवकरच ट्राय फोल्ड हँडसेट देखील लाँच करणार आहे. ट्राय फोल्डच्या मदतीने, फोन उघडल्यावर मोठ्या डिस्प्लेचा अनुभव मिळू शकणार आहे.


