Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Redmi Note 15 5G चा पहिला सेल; 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळतोय ‘इतका’ डिस्काउंट

Redmi Note 15 5G चा पहिला सेल; 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळतोय ‘इतका’ डिस्काउंट

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Redmi Note 15 5G भारतात नुकताच लाँच झाला. हा फोन आता विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. जर तुम्हाला तो खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो Amazon आणि mi.com वरून खरेदी करू शकता. हा Redmi फोन AMOLED डिस्प्लेसह येतो आणि स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर यामध्ये असणार आहे.

Redmi Note 15 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा लेन्स 108MP आहे. स्मार्टफोनमध्ये 5520mAh बॅटरी दिली गेली आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे, जो 2026 मध्ये लाँच झाला होता. Redmi Note 15 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22999 असणार आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24999 आहे. हा हँडसेट ३००० च्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ही ऑफर SBI, Axis Bank आणि ICICI बँक क्रेडिट कार्डवर लागू असणार आहे.

डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन १९९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. २५६GB स्टोरेज व्हेरिएंट डिस्काउंट दिल्यानंतर २१९९९ मध्ये हा फोन उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्लेशियर ब्लू आणि मिस्ट पर्पल कलर ऑप्शनमध्ये येतो. कंपनीने Redmi Note १५ ५G हा अँड्रॉइड १५ सह लाँच केला. कंपनी चार वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देईल. स्मार्टफोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.७७-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि गोरिल्ला ग्लास ७i आहे.

यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, ज्यामध्ये १०८MP प्रायमरी कॅमेरा आणि ८MP सेकंडरी कॅमेरा आहे. कंपनीने फ्रंटला २०MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेटला पॉवर देणारी ५५२०mAh बॅटरी आहे जी ४५W चार्जिंग सपोर्ट आणि १८W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!