नवी दिल्ली : सध्या Airtel, Vi, BSNL सह Jio सारख्या कंपन्या मोबाईल नेटवर्क सेवा देत आहेत. त्यात Jio कंपनीने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन आणले आहेत. कंपनीने ३० रुपयांपेक्षा कमी किमतीचे तीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. या बजेटमध्ये ११, १९ आणि २९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
जिओचे हे तिन्ही डेटा व्हाउचर आहेत जे तुमच्या ऍक्टिव्ह प्लॅनसोबत वापरले जाऊ शकतात. प्रथम, जिओच्या ११ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन अंतर्गत, कंपनी एका तासासाठी डेटा देते. यामधून एकूण १० जीबी डेटा दिला जातो. कंपनी या प्लॅन अंतर्गत अलिमिटेड डेटा देत असली तरी, डेटा स्पीड १० जीबीपर्यंत मर्यादित असेल. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, डेटा स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होईल. पोर्टफोलिओमधील दुसऱ्या प्लॅनची किंमत १९ आहे. या किमतीत, कंपनी एका दिवसाच्या वैधतेसाठी 1GB डेटा देत आहे. ज्यांचा दैनंदिन डेटा संपला आहे आणि त्यांना काही डेटाची आवश्यकता असेल तर त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.
या यादीतील तिसऱ्या प्लॅनची किंमत २९ आहे. हा प्लॅन २ दिवसांच्या वैधतेसह येतो आणि २GB डेटा दिला जातो. या सर्व प्लॅनचा वापर करण्यासाठी, तुमच्याकडे एक ऍक्टिव्ह प्लॅन असणे आवश्यक आहे. जिओच्या पोर्टफोलिओमधील सेवा प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, २८ दिवसांच्या प्लॅनसाठी तुम्हाला किमान १८९ खर्च करावे लागतील.


