नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने त्यांचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने ब्रँडचा फ्लॅगशिप फोन Xiaomi १७, चिनी बाजारात लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येतो, ज्यामध्ये क्वालकॉमही असणार आहे. शाओमीच्या नवीन फोनमध्ये लेइका कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
कंपनीने Xiaomi १७ Pro आणि शाओमी १७ प्रो मॅक्स देखील लाँच केले. शाओमी १७ हा स्मार्टफोन ७००० एमएएच बॅटरीसह येतो जो १०० वॉट चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीने शाओमी १७४४९९ युआन (अंदाजे ५६००० रुपये) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला. ही किंमत 12GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. त्याच्या 12GB RAM + 512 GB स्टोरेज आणि 16GBRAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे ४७९९ युआन (अंदाजे ६०००० रुपये) आणि ४९९९ युआन (अंदाजे ६२००० रुपये) असणार आहे. हा स्मार्टफोन निळ्या, काळ्या, पांढऱ्या आणि गुलाबी कलर ऑप्शनमध्ये येतो.
शाओमी १७ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.३-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १६ वर आधारित हायपर ओएस ३ वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर आहे. यात ५० एमपी प्रायमरी लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही दिला गेला आहे.


