पावसाळा येत्या काही दिवसांत संपेल. त्यानंतर हिवाळा सुरु होईल. त्यातच गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहता, दर हिवाळ्यात वायू प्रदूषणाची पातळी वाढताना दिसून आली. प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने लोकांमध्ये अनेक आजार होऊ शकतात. वातावरणातील बदलामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. प्रदूषणामुळे डोळ्यांना जळजळ होऊ शकते आणि दम्याच्या रुग्णांचे आरोग्यही बिघडू शकते.
हिवाळ्यात वायू प्रदूषणापासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी, तुम्ही घरी एअर प्युरिफायर वापरू शकता. बाजारात किंमत आणि वैशिष्ट्यांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. सध्या, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर विक्री सुरू आहे. तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम एअर प्युरिफायर खरेदी करण्यासाठी या विक्रीचा फायदा घेऊ शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर एअर प्युरिफायरची कॅटेगरी उपलब्ध आहे. अनेक कंपन्या फक्त ५००० रुपयांमध्ये एअर प्युरिफायर देतात, तर चांगल्या एअर प्युरिफायरची किंमत तुम्हाला ८०००-१०००० रुपयांपर्यंत मिळणार आहे.
जर तुम्ही तुमच्या घरासाठी एअर प्युरिफायर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाईन खरेदी केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कारण, या सेलदरम्यान याची किमती कमी झाल्याचे दिसून येत आहे.


