Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाचे ! आता iPhone वर एकाच वेळी वापरता येणार दोन अकाउंट्स

WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाचे ! आता iPhone वर एकाच वेळी वापरता येणार दोन अकाउंट्स

नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया ॲप्स आहेत. त्यात WhatsApp चा वापर वाढताना दिसत आहे. कंपनीकडून युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स आणले जात आहेत. त्यातच आता नवीन अपडेटमुळे अनेक डिव्हाईसेसवर चॅट मॅनेज करता येणार आहे. याचा फायदा अनेक युजर्संना होणार आहे.

WhatsApp च्या नवीन अपडेटनुसार, युजर्सला स्टोरेज, अकाउंट मॅनेज, मेसेजिंग टूल्स आणि एआय-आधारित सुधारणांचा समावेश आहे. व्हॉट्सॲपने नवीन स्टोरेज टूल्स जाहीर केले आहेत, ज्यामुळे युजर्स एकाच चॅटमधील मोठ्या फाइल्स शोधून हटवू शकतील. युजर्सना संपूर्ण चॅट हटवण्याची गरज नाही. युजर्सना फक्त मीडिया (फोटो आणि व्हिडिओ) हटवून मजकूर संदेश जतन करण्याचा पर्याय दिला आहे.

WhatsApp ने जाहीर केले आहे की, चॅट हिस्ट्री हस्तांतरित करणे सोपे होईल. वापरकर्ते आता क्लाउड बॅकअपशिवाय ॲपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टम आणि गूगलच्या अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये थेट संदेश, फोटो आणि व्हिडिओ हस्तांतरित करू शकतील. यासाठी एका सोप्या प्रक्रियेची आवश्यकता आहे.

ॲपलच्या आयफोनवर मल्टी-अकाउंट फीचर लाँच

ॲपलने आयफोनसाठी मल्टीपल अकाउंट्सची सुविधा सादर केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना आयफोनवरील एकाच ॲपमध्ये दोन अकाउंट्स चालवता येतील. वापरकर्त्यांना लॉग आउट न करता फक्त अकाउंट्समध्ये स्विच करायचे आहे. टॅब बारमध्ये एक प्रोफाइल फोटो दिसेल, जो कोणते अकाउंट सक्रिय आहे हे दर्शवेल. यामुळे वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि कामाचे चॅट्स आणि अकाउंट्स वेगळे ठेवता येतील.

मेटा एआय (Meta AI) सह फोटो एडिटिंग

व्हॉट्सॲपवर उपलब्ध असलेल्या मेटा एआयच्या मदतीने, तुम्ही फोटो एडिट देखील करू शकता. यामुळे तुम्हाला ऑब्जेक्ट्स काढता येतील, बॅकग्राउंड बदलता येईल आणि विविध स्टाइल्स लागू करता येतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!