Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नवीन महिना, नवीन बदल; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम, आधारकार्ड अपडेट…

नवीन महिना, नवीन बदल; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम, आधारकार्ड अपडेट…

मुंबई : नवीन महिना अर्थात नोव्हेंबर महिन्यात अनेक आर्थिक बदल होत आहेत जे तुमच्या मासिक खर्चावर थेट परिणाम करणार आहे. नोव्हेंबर महिन्यात एलपीजी ते आधारपर्यंतचे नियम बदलत आहेत. नोव्हेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅब आणि कार्ड शुल्क देखील लागू केले जात आहेत. नवीन महिन्यापासून होत असलेले बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करणार आहेत.

गॅस सिलेंडरबाबत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत बदलली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत ५ रुपयांनी कमी झाली आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १५९०.५० झाली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा शेवटचा बदल एप्रिलमध्ये करण्यात आला होता. याशिवाय, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) मुलांच्या आधार कार्डच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी १२५ रुपयांचे शुल्क माफ केले आहे. हे शुल्क एका वर्षासाठी माफ केले जाईल.

तर प्रौढांसाठी, नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर यांसारखे तपशील अपडेट करण्यासाठी ७५ खर्च येईल तर फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन सारखे बायोमेट्रिक अपडेट १२५ खर्च येईल. शिवाय, तुम्ही आता कोणतेही सहाय्यक कागदपत्रे सादर न करता तुमचा आधार पत्ता, जन्मतारीख किंवा नाव ऑनलाईन अपडेट करू शकता. हा नियम नोव्हेंबरपासून लागू होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!