Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ind vs SA Women World Cup Final 2025: टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष; कोण मारणार बाजी?

Ind vs SA Women World Cup Final 2025: टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष; कोण मारणार बाजी?

India vs South Africa Women’s World Cup 2025 Live Scorecard Updates: आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ चा फायनल भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघामध्ये खेळवला जात आहे. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. सगळेच खेळाडू जोर लावून खेळ दाखवत आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत भिडत आहेत. दोन्ही संघांना एकदाही जेतेपदाची ट्रॉफी जिंकता आलेली नव्हती. त्यामुळे जो संघ जिंकेल, त्या संघाकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

पावसामुळे नाणेफेक 4.30 वाजता उशीरा झाली आणि सामना 5 वाजता सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मनधना आणि शफालीने सामन्याl दमदार सुरूवात केली. पण अर्धशतकाची संधी असताना स्मृती मानधना माघारी परतली. ती 45 धावांवर झेलबाद होऊन माघारी परतली आहे. शफाली वर्मानं दमदार अर्धशतक केलं. सलामीला फलंदाजीला आलेली शफाली वर्मा 87 धावांवर झेलबाद झाली. सेमीफायनलची हिरो जेमिमा फायनलमध्ये स्वस्तात माघारी परतली. या सामन्यात 24 धावा केल्या. कर्णधार हरमप्रीत कौर 20 धावांवर बाद झाली. दीप्ती शर्मासुद्धा 20 धावांवर पायचित झाली होती. त्यानंतर डीआरएस घेतला असता, पिचींग आऊटसाईड लेग असल्यामुळे ती थोडक्यात बचावली दीप्तीने दबावात टिकून उत्तम फलंदाजी करून दाखवली. दीप्ती शर्मा आणि रिचा घोषची जोडी चांगलीच जमली होती. पण ती 34 धावा करून माघारी परतली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11:

भारतीय संघ: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर

दक्षिण आफ्रिका संघ: लॉरा वॉल्वार्ड्ट (कर्णधार), तॅझमिन ब्रिट्स, ॲनीके बॉश, सुने लूस, मॅरिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), ॲनिएरी डर्कसन, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, आयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!