Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bihar Election 2025 Opinion Poll : बिहारचा ओपिनियन पोल समोर, एनडीएला स्पष्ट बहुमताचा अंदाज; महागठबंधनला झुकते माप

Bihar Election 2025 Opinion Poll : बिहारचा ओपिनियन पोल समोर, एनडीएला स्पष्ट बहुमताचा अंदाज; महागठबंधनला झुकते माप

Bihar Election 2025 Opinion Poll : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election 2025) पहिल्या टप्प्यात उद्या (६ नोव्हेंबर २०२५) १२१ जागांसाठी मतदान होणार असून, मतदानापूर्वी जाहीर झालेल्या अनेक ओपिनियन पोल्समध्ये (Opinion Polls) राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

पोल ऑफ पोल्सनुसार, एनडीएला १४३ जागा, महागठबंधनला (Mahagathbandhan) ९५ जागा आणि इतरांना ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. हे सर्वेक्षण मतदानाच्या तोंडावर झाले असून, राज्यातील २४३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

IANS-MATRIZE ओपिनियन पोल: एनडीएला १५३-१६४ जागा

IANS-MATRIZE च्या ताज्या सर्वेक्षणानुसार एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करेल. यात एनडीएला १५३-१६४ जागा मिळण्याचा अंदाज असून, महागठबंधनला ७६-८७ जागा मिळू शकतात. भाजपला सर्वाधिक जागा (८३-८७) मिळण्याची शक्यता असून, जेडीयूला ६१-६५, एचएएमला ४-५, लोक जनशक्ती पार्टीला ४-५ आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला १-२ जागा मिळतील. मतदानाचा टक्का ४९% एनडीएला, ३८% महागठबंधनला आणि १३% इतरांना असण्याचा अंदाज आहे.

महागठबंधनबाबत, आरजेडीला सर्वाधिक ६२-६६ जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसला ७-९, सीपीआयला ६-८, सीपीआय आणि सीपीएम(मार्क्सवादी) ला प्रत्येकी ०-१, व्हीआयपीला १-२ जागा मिळतील. असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमला १-२ आणि प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षाला १-३ जागा मिळण्याची शक्यता आहे. हे सर्वेक्षण नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी ४६% पाठिंबा दाखवते, तर तेजस्वी यादव यांना १५%.

चाणक्य स्ट्रॅटेजीज सर्वे: एनडीएला १३०+ जागा, महागठबंधनला ११० पेक्षा कमी

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या (Chanakya Strategies) ताज्या सर्वेक्षणानुसार, एनडीएला १३० पेक्षा जास्त जागा मिळून बहुमत मिळेल, तर महागठबंधनला ११० पेक्षा कमी जागा मिळतील. इतर पक्षांना ५-९ जागा मिळू शकतात. हे सर्वेक्षण एनडीएच्या मजबूत स्थितीचे दर्शन घालते, ज्यात भाजप आणि जेडीयू प्रमुख भूमिका बजावतील.

पोलस्ट्रॅट सर्वे: एनडीएला १३३-१४३ जागा, जनसूरजला १-३ जागा

पोलस्ट्रॅट-पीपल्स इनसाइट (Pollstrat) च्या सर्वेक्षणात एनडीएला १३३-१४३ जागा मिळण्याचा अंदाज असून, भाजपला ७०-७२ जागा मिळतील. महागठबंधनला ९३-१०२ जागा मिळू शकतात, तर प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षाला १-३ जागा मिळून खाते उघडण्याची शक्यता आहे. हे सर्वेक्षण युवा मतदारांमध्ये जनसूरजच्या वाढत्या प्रभावाचे संकेत देते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!