Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फलकाखाली लघुशंका केल्यामुळे युवकाला धमक्या; ट्रोलिंगला भिवून तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

फलकाखाली लघुशंका केल्यामुळे युवकाला धमक्या; ट्रोलिंगला भिवून तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

जालना: छत्रपती संभाजीनगर नामफलका खाली दोन मित्रांचा लघुशंका करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तरुणांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर त्यांना तिथे धमक्याही येऊ लागल्या. त्यामुळे, या तरुणांनी माफीनाम्याचा देखील एक व्हिडिओ बनवला होता. पण तरीही धमक्या थांबत नसल्याने जालन्यातील 28 वर्षीय महेश आडे या तरुणाने विहिरीत उडी घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सोशल मिडिया आणि ट्रोलिंगमुळे आजपर्यंत अनेकांनी टोकाच्या भूमिका उचलल्याच पहायला मिळालं. त्यात आता ही ताजी घटना घडली. क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने जालन्यात चर्चा सुरू आहेत. धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत कुटुंबीय व नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील संभाजीनगर नावाच्या पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना आढळून आले होते. त्यावेळी, तिथे एका तरुणाने या लघुशंका करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ काढला होता. लघुशंका करणारे दोन्हीही तरुण नशेत होते. या दोन्हीही तरुणांचा दुसऱ्या दिवशी माफीचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. मात्र, काही हुल्लडबाजांनी याकडे दुर्लक्ष केल आणि त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

आत्महत्येपूर्वी मित्रांसोबत चर्चा

तरूणांना रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. या धमक्यांना कंटाळून 28 वर्षीय महेश आडे या तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी, हे सगळं मला सहन होत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीन असं महेश आडे याने मित्रांजवळ बोलूनही दाखल होतं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!