Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पायऱ्या चढताना तुमच्या गुडघ्यातून आवाज येतोय? तर वेळीच घ्या काळजी, होणार नाही अडचण…

पायऱ्या चढताना तुमच्या गुडघ्यातून आवाज येतोय? तर वेळीच घ्या काळजी, होणार नाही अडचण…

सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गोष्टी स्मार्ट होताना दिसत आहे. लोक लिफ्ट किंवा एस्केलेटरला पायऱ्यांपेक्षा अधिक सोयीस्कर मानत आहेत. हे लोकांना स्थिर उभे असतानाही कोणत्याही मजल्यावर मेहनतीविना जाण्याची सुविधा देतात. यामुळे गुडघ्यांची हालचाल कमी होते. मात्र, जेव्हा काही लोक पायऱ्या चढतात किंवा बसतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या गुडघ्यांमध्ये थोडासा आवाज येत असेल तर काळजी घेण्याची गरज आहे.

पायऱ्या चढताना किंवा बसताना तुमचे गुडघे आवाज करत असतील तर हा आवाज गुडघ्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकतो. तरुणांमध्ये अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे. एकाच खुर्चीवर ८-१० तास दीर्घकाळ काम करणाऱ्या आणि त्यांच्या शरीराने दिलेल्या कोणत्याही सिग्नलकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये हे प्रकरण अधिक सामान्य आहे. गुडघ्यांना वारंवार ताण आल्यावर ही समस्या वाढते. परंतु स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम केले जात नाहीत आणि त्यांना विश्रांती दिली जात नाही. त्यामुळे समस्या आणखी बिकट होऊ शकते.

खराब पोश्चर, मर्यादित हालचाल आणि उच्च-प्रभाव व्यायाम देखील गुडघ्यांतून समस्या निर्माण करू शकतं. आपले शरीर अनेकदा आपल्याला काहीतरी वेगळं घडतंय याचा इशारा देत असतं. जर त्याकडे दुर्लक्ष केले तर ते वाढू शकते. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!