Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘त्याने जे करायला नको होतं ते केलं…’; जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप

‘त्याने जे करायला नको होतं ते केलं…’; जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप

Jarange Patil On Dhananjay Munde: मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. याआधी त्यांनी माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा गंभीर आरोप केला होता. त्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी सर्व दावे फेटाळून लावले होते. पण आता जरांगे यांनी पुन्हा माध्यमांसमोर येत धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे.

साहेब, तुम्ही आले का परळीला?

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटलांनी प्रथम दोन अटक आरोपींच्या संभाषणाची क्लिप ऐकवली आणि त्यानंतर धनंजय मुंडे आणि एका आरोपीमधील संवादाचा ऑडिओ ऐकवला. या क्लिपमध्ये आरोपी म्हणतो ‘साहेब, तुम्ही आले का परळीला?’ यावर मुंडे उत्तर देतात,“नाही, अजून पुण्याला आहे… गरबड करू नका.” यानंतर आरोपी विचारतो, “गाडीचं काय झालं?” त्यावर मुंडे म्हणतात, “आता नवीन गाडी देऊ शकत नाही, जुनी गाडी देऊ शकतो.”

माझ्या अंगावर गाडी घालायची होती – जरांगे पाटील

या क्लिपनंतर पत्रकारांनी गाडीविषयी विचारले असता जरांगे म्हणाले, ही तीच गाडी आहे जी आमच्या ताफ्यात देण्यात येणार होती आणि नंतर आमच्या अंगावर घालायची होती. जर ही क्लिप खोटी असेल तर सीडीआर काढा, लोकेशन तपासा. कोण कुठे होतं, कोण कुणाला भेटलं. सर्व समोर येईल. ते पुढे म्हणाले की, माझं आणि धनंजय मुंडेंचं वैर नाही. पण माझ्या मुळावर प्रहार करण्याचा प्रयत्न होत आहे. हे गंभीर आहे.

हेही वाचा – ‘जरांगे तारीख आणि जागा तुम्ही सांगा…’; मनोज जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मी सगळ्या गोष्टींना तयार आहे

दरम्यान, जरांगे पाटील यांनी सांगितले की, मी सगळ्या गोष्टींना तयार आहे. अशा प्रवृत्ती समाजासाठी घातक आहेत. आता ओबीसींना यात ओढून घेणं योग्य नाही. अजित दादा, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांनी या प्रकरणाचा छडा लावावा. ते पुढे म्हणाले, मराठा समाजाने शांत राहावे. मी सगळं नीट करतोय. फक्त मला थोडा वेळ द्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!