Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘हे सर्व चक्र फार जास्त…’

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘हे सर्व चक्र फार जास्त…’

 संभाजीनगर: उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. कर्जमाफीच्या विषयावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आग्रही असतानाच त्यांनी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावर भाष्य केलं. मराठवाड्याच्या दौऱ्याचा त्यांचा आज तिसरा दिवस आहे. नुकतच बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळा आपड करायची हा माझा उद्धेश नाहीये. माझा पक्ष, चिन्ह चोरले गेले. मात्र, माझी माणसं जाग्यावर आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा पार्थ पवारांकडे वळवला. अंबादास दानवे यांनी अजित पवारांच्या पोराचे प्रकरण काढले असं त्यांनी म्हटलं .

पुढे त्यांनी म्हटलंकी, अगोदर हे तुमच्याकडून एकदम कमी भावाने जमिन घेणार आणि त्यानंतर या जमिनीची सोन्यापेक्षाही जास्त किंमत वाढेल. अजित पवारांच्या पोराचे प्रकरण काढलंय अंबादासने. हे सर्व चक्र फार जास्त घाणेरडे आहे. महामार्गातील जमिनी कोण खरेदी करतंय बघा. शक्तीपीठ महामार्गाच्या शेजारी कोण जमीन खरेदी करतंय हे देखील पाहा. शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूच्या जमिनी दलालांच्या आहेत. उद्धव ठाकरे टोमणे मारतात, असे मुख्यमंत्री बोलतात. न्याय मागितला की, टोमणे मारतात असे बोलतात.

पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, मी माझे कर्तव्य म्हणून कर्जमुक्ती केली होती, उपकार म्हणून नाही. आज तर मी कोणीही नाहीये… माझे वडील चोरले, पक्ष चोरले सर्वकाही चोरले माझी माणसे जाग्यावर आहेत, ती नाही तुम्ही चोरू शकत. माझं कर्तव्य आहे की, काहीही नसतानाही ही जी ताकद आहे, त्या ताकदीसाठी काम करणं. राज्यातील शेतकरी संकटात आहे. या सर्व व्यथा मी ऐकत आहे आणि या माहिती नाहीत, असेही नाहीये.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!