Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दोषींना सोडलं जाणार नाही; दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

दोषींना सोडलं जाणार नाही; दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

Delhi Bomb Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, ‘संपूर्ण देश पीडित कुटुंबियांसोबत आहे आणि या घटनेमागील कट रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही.’ भूतान दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते रात्रभर तपासात गुंतलेल्या सर्व सुरक्षा एजन्सींशी संपर्कात होते आणि आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, या कटामागील सत्य बाहेर काढण्यासाठी भारतातील सर्व संसाधनांचा वापर केला जाईल. दोषींना त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल.

पंतप्रधानांनी स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांना संवेदना व्यक्त करत म्हटले की, संपूर्ण देश या दु:खात सहभागी आहे. जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी सुरक्षा व कायदा अंमलबजावणी यंत्रणांना निष्पक्ष, जलद आणि ठोस तपास करण्याचे निर्देश दिले असून, जबाबदारांवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा –Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात, देशभरात पोलीस यंत्रणा सतर्क

भूतानमधील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भारत-भूतान मैत्रीबद्दलही महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाते हे शतकानुशतकांचे आहे आणि हे संबंध काळानुसार अधिक दृढ होतील. त्यांनी जाहीर केले की भारत लवकरच गेलेफूजवळ नवी चौकी (Check Post) उभारणार आहे, ज्यामुळे पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळेल.

पंतप्रधान मोदींचा हा भूतान दौरा 11 व 12 नोव्हेंबर रोजीचा असून, गेल्या 11 वर्षांतला हा त्यांचा चौथा दौरा आहे. त्यांनी यावेळी भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताकडून दिलेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचा उल्लेख करत सांगितले की, भारत आणि भूतानची प्रगती परस्परांशी जोडलेली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!