Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात, देशभरात पोलीस यंत्रणा सतर्क

Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात, देशभरात पोलीस यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली: दिल्ली स्फोट प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. स्फोट झाल्यानंतर दोन तासांच्या आत या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. या स्फोटामागे घातपात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. दिल्ली स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी आहेत.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी एक स्फोट झाला. त्यानंतर त्या ठिकाणी पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांना आग लागली. सकाळीच हरियाणातील फरिदाबादमध्ये सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्याचा या स्फोटाशी काही संबंध आहे का याचा तपास करण्यात येत आहे.

एक संशयित ताब्यात

दिल्ली स्फोटानंतर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्वत्र झाडाझडती सुरू आहे. त्याचवेळी स्फोट घडल्यानंतर दोन तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली स्फोटानंतर यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

11 जणांचा मृत्यू

राजधानी दिल्लीमध्ये संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट घटला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन सिग्नलजवळ हा स्फोट झाला. यावेळी दोनदा मोठ्या स्फोटाचा आवाज झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि या त्यात काही गाड्या जळून खाक झाल्या. या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी असल्याची माहिती मिळते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!