Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिल्ली स्फोटाचा ‘धुरंधर’वर परिणाम; रणवीर सिंगचा ट्रेलर लाँच ढकलला पुढे, आता नवी तारीख…

दिल्ली स्फोटाचा ‘धुरंधर’वर परिणाम; रणवीर सिंगचा ट्रेलर लाँच ढकलला पुढे, आता नवी तारीख…

मुंबई : रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी (दि.१२) मुंबईत प्रदर्शित होणार होता. यासाठी निर्मात्यांनी एका भव्य इव्हेंटही प्लॅन केला होता. पण आता हा इव्हेंट पुढे ढकलला आहे. दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

‘धुरंधर’च्या ट्रेलर लाँचला सुमारे २००० फॅन्स उपस्थित राहणार होते. मात्र, रणवीर सिंगने ट्रेलर लाँच होणार नसल्याचे सांगितले. रणवीरने दिल्ली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘धुरंधर’ चा ट्रेलर लाँच पुढे ढकलण्यात आला असल्याचे म्हटले. दिल्ली स्फोटात जीव गमावलेल्या आणि बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होताना हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन ट्रेलर रिलीजची तारीख आणि इतर डिटेल्स लवकरच तुमच्यासोबत शेअर केले जातील, असे सांगण्यात आले.

याशिवाय, रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पीडितांच्या कुटुंबियांसाठी एक संदेश शेअर केला. त्याने लिहिले की, दिल्लीत घडलेल्या घटनेने माझे मन दुखावले आहे. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल माझी संवेदना. रणवीर व्यतिरिक्त, ‘धुरंधर’मध्ये संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अली खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!