मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. सणासुदीचे दिवसही संपले आहेत. त्यात आता आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्याचे भाव घसरले तर चांदीचे भाव वाढल्याचे दिसून आले. सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १२३००० च्या वर राहिले आहेत. चांदीचे भाव प्रति किलोग्रॅम १५५००० च्या वर राहिले आहेत.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ११३७२० रुपये होता. बुधवारी १२ नोव्हेंबरच्या सकाळी हा भाव घसरून ११३००० रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे, शुद्धतेनुसार सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत, तर चांदीचे भाव वाढले आहेत. मंगळवारी सकाळच्या तुलनेत संध्याकाळी सोन्याचे भाव जवळपास सारखेच राहिले, तर चांदीचे भाव वाढले. ९९.९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याचा भाव सकाळी १२४१४७ रुपये होता, जो संध्याकाळी १० ग्रॅमसाठी १२४१४९ रुपये झाला. चांदीच्या किमतीही १५४३३८ रुपये वरून १५४७६० रुपये प्रति किलो झाल्या.
दरम्यान, चांदीच्या तुलनेत सोन्याचे दर सर्वाधिक असतात. कारण, यातून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कलही सोने खरेदीवर असतो. मागील पाच वर्षांतील सोने-चांदीचे दर पाहिले तर यातून दरात मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळणार आहे.


