Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुवर्णसंधी ! तुम्हाला मिळू शकते ‘या’ सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज,

सुवर्णसंधी ! तुम्हाला मिळू शकते ‘या’ सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज,

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. परीक्षा, मुलाखती देणारेही अनेक आहेत. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते.  पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 20000 रुपयांपर्यंत मिळू शकतो.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ऑफिस असिस्टंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहिल्यानगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. – या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर.
– वेतन / मानधन : 20000 रुपयांपर्यंत.

– वयोमर्यादा : 22-40 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० नोव्हेंबर २०२५.

– अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक/अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, अहिल्यानगर. प्लॉट क्रमांक पी/५६, एमआयडीसी, नव नागापूर, अहिल्यानगर, महाराष्ट्र पिन ४१४१११.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!