मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. ती लवकरच कलर्स टीव्हीवरील हिट कुकिंग शो ‘लाफ्टर शेफ’ सीझन ३ मध्ये तिचा पार्टनर करण कुंद्रासोबत दिसणार आहे. तेजस्वी यापूर्वी ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’सारख्या सुपरहिट रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती, जिथे तिला खूप पसंती मिळाली होती. आता तिच्या स्टंटबाबतच एक माहिती समोर आली आहे.
तेजस्वी एका रिअॅलिटी शो दरम्यान गंभीर जखमी झाली होती. तेजस्वी ‘बिग बॉस १५’ ची विजेती होती. शोमधील तिचा प्रवास खूपच प्रभावी होता. ती यापूर्वी रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’शोमध्ये दिसली होती, जिथे तिच्या कॉमिक टायमिंगचे चांगलेच कौतुक झाले होते. स्टंटदरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तेजस्वीला शो मध्येच सोडावा लागला होता. शोमध्ये स्टंट करताना तेजस्वीच्या डोळ्याजवळील रक्तवाहिनी फुटली होती. ज्यामुळे तिला लगेच शो सोडावा लागला.
भारती सिंगच्या पॉडकास्टवर तेजस्वी प्रकाशने संपूर्ण घटनेची आठवण करून दिली. तिने सांगितले की, ‘मी गंभीर जखमी झाले होते. रोहित शेट्टी सरांनी एखाद्या स्पर्धकासाठी स्टंट रद्द करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. एका स्टंट दरम्यान, माझ्या डोळ्यांतील नसा फुटल्या. ते खूप भयानक होते. तरीही, मी शो सोडत नव्हतो’.


