Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांना वेग; ‘या’ तारखेला होणार निवडणुका

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांना वेग; ‘या’ तारखेला होणार निवडणुका

Zilla Parishad Election: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी चांगलीच जोर धरला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचार मोहीम रंगणार असली, तरी सगळ्यांची उत्सुकता जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांकडेच खिळून आहे. आतापर्यंत अधिकारी पदे रिक्त असल्याने प्रक्रिया ठप्प होती, पण आता या निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

रिक्त पदांमुळे विलंब

उपजिल्हाधिकारी (SDO) स्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी (ERO) म्हणून काम करणारी अनेक पदे रिक्त असल्याने ZP-पंचायत समिती निवडणुकांचा दुसरा टप्पा अडकला होता. मात्र महसूल विभागाने ७ नोव्हेंबरला मोठा निर्णय घेत ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली. हे अधिकारी पुढील आठ ते दहा दिवसांत नवीन पदस्थापनेवर रुजू होणार असून त्यांचे कार्यभार स्वीकारण्याचे अहवाल विभागीय आयुक्तांकडे जमा केले जात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच जिल्हा परिषद निवडणुकांच्या पुढील टप्प्याचा कार्यक्रम नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का; स्थानिक नेतृत्वाला कंटाळून बड्या नेत्याचा राजीनामा

राज्य निवडणूक आयोगाने रिक्त पदांमुळे निवडणूक प्रक्रिया अडखळत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. विशेषतः उपजिल्हाधिकारी पदे भरण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती. तथापी, सरकारने तातडीने कारवाई करत पदोन्नतीची ऑर्डर काढली. यामुळे निवडणूक प्रक्रिया पुन्हा गतीत आली असून आता केवळ अधिकाऱ्यांच्या रुजूची औपचारिकता बाकी आहे.

नगरपरिषद–नगरपंचायतींच्या निकालानंतर मोठा कार्यक्रम

दरम्यान, ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायतींचे निकाल लागू शकतील. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्या यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची तयारी आयोगाकडून सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरनंतर निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!