Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार! अद्वय हिरेंसह राजू शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार! अद्वय हिरेंसह राजू शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश

Advay Hire Join BJP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राज्यभरात पक्षांतराचा वेग वाढला आहे. विशेषतः सत्ताधारी भाजपकडे विविध पक्षांमधून होणारे आगमन लक्षवेधी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे बदलवू शकणारे नेते राजू शिंदे, तर नाशिकमधील महत्त्वाचे युवा नेते अद्वय हिरे दोघांनीही आज औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर शिंदे गटाचे कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनीही भगवा हातात घेतला.

राजू शिंदे आता भाजपमध्ये

2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना तगडे आव्हान देणारे राजू शिंदे यांनी आज पुन्हा एकदा “घरवापसी” केली. प्रवेशानंतर ते म्हणाले, मी भाजप कधीच सोडला नव्हता, फक्त तांत्रिक कारणाने काही काळ दूर गेलो होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला एकहाती ताकद मिळणारच. अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यात 100 टक्के भाजप करणार आहोत. त्यांच्या प्रवेशामुळे 2029 च्या रणनीतीची भाजपने आत्ताच सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हेही वाचा – Amit Thackeray : अनावरण केल्यानंतर २४ तासांतच पुन्हा झाकला शिवरायांचा पुतळा; अमित ठाकरे संतापले

अद्वय हिरेंचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक जिल्ह्याचे युवा नेतृत्व असलेले अद्वय हिरे यांनीदेखील आज भाजपमध्ये प्रवेश करताच नाशिक–मालेगावमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिरेंनी आपल्या भाषणात स्पष्ट संदेश दिला की, मालेगाव आणि नांदगावात महापौर पदावर भाजपच बसणार, आम्ही शंभर टक्के तयारीत आहोत. गिरीश महाजन यांनी दिलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे.

भरत राजपूत यांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, शिंदे गटाचे कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनीदेखील आज नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मंचावरून काहीही न दडपता आरोपांची सरबत्ती केली. साडेतीन वर्षे मला शिंदे गटात कायम गौण समजले गेले. त्या काळात फक्त भाजपच माझ्या पाठीशी उभी राहिली. आता योग्य व्यासपीठ मिळालंय, त्यामुळेच हा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे कन्नड तालुक्यातील शिंदे गटाची स्थिती आणखी डळमळीत झाली असल्याचे मानले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!