Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘एका हाताने टाळी वाजत नाही…’; मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कारानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

‘एका हाताने टाळी वाजत नाही…’; मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कारानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

Bharat Gogawale Statement: राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र आता धूसर होताना दिसत आहे. भाजपने राबवलेल्या ‘ऑपरेशन लोटस’च्या हालचालींमुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी उसळली असून त्याचा पहिला परिणाम मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कारातून दिसून आला. एकनाथ शिंदे यांना वगळता जवळपास सर्वच मंत्र्यांनी बैठकीस हजेरी लावली नाही. या घडामोडींनंतर मुख्यमंत्री आणि शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू असून तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. “थोड्याच वेळात आम्ही एक स्फोट करणार आहोत, तो पाहा,” असा इशारा त्यांनी दिला. मात्र, हा ‘स्फोट’ आमच्या नैसर्गिक युतीतील पक्षांना उद्देशून नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीवर बहिष्कार का? या प्रश्नावर गोगावले यांनी, “आम्ही वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला गैरहजर राहिलो. यामध्ये इतर कोणताही अर्थ काढू नये,” असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. त्यांनी पुढे सांगितले की, चुका दोन्हीकडूनच होतात. टाळी एका हाताने वाजत नाही. मुख्यमंत्री आणि आमचे नेते शिंदेसाहेब या मुद्द्यांवर चर्चा करून मार्ग काढतील. यासोबतच त्यांनी रायगड जिल्ह्यातील राजकारणावर भाष्य करत, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना स्पष्ट इशारा दिला की, आता रायगडमध्ये जशास तसं उत्तर दिलं जाईल. मात्र, त्यांच्या ‘स्फोटा’चा संबंध या युतीतील पक्षांसोबत जोडू नये, असेही त्यांनी ठामपणे म्हटले.

हेही वाचा – राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ! एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये तणाव? मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित

निधी वितरणाच्या मुद्द्यावरही शिंदे गटाकडून नाराजी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वेळी आम्हाला भरभरून निधी मिळाला. पण नव्याने निवडून आलेल्या काहींकडे निधीची कमतरता भासतेय. यावर मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब मार्ग काढतील, असे गोगावले म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!