Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज छाननीत बाद; अनगर नगराध्यक्षपदासाठी BJP चा मार्ग मोकळा

राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज छाननीत बाद; अनगर नगराध्यक्षपदासाठी BJP चा मार्ग मोकळा

Anagar Nagar Panchayat Election: अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठा बदल घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज आज अपात्र ठरविण्यात आला. त्यांच्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याची गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी सांगितले. थिटे यांच्या उमेदवारीमुळे १७ नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आल्यानेही नगराध्यक्षपदाला निवडणूक लागू झाली होती. नगराध्यक्षपदासाठी एकूण तीन अर्ज दाखल झाले होते. त्यात भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुना प्राजक्ता पाटील, अपक्ष सरस्वती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा समावेश होता.

थिटे यांची उमेदवारी बाद

छाननी प्रक्रियेला अपेक्षित वेळेपेक्षा अधिक विलंब झाला. दुपारी साडेतीनपर्यंतही कागदपत्रांची तपासणी सुरू होती. राज्यभरातून या छाननीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. अखेरीस, आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे थिटे यांची उमेदवारी बाद करण्यात आल्याचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर झाला. दरम्यान, थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर दुसरे अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजप उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 14 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 169 अर्ज दाखल

अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी थिटे यांच्या अर्जावर अनेक आक्षेप नोंदवले होते. त्यामध्ये अर्जावरील सूचकाची सही नसणे, मतदार यादीतील प्रभाग व अनुक्रमांक चुकीचा असणे, उमेदवाराच्या वयाचा पुरावा जोडलेला नसणे, सूचकाचा मतदार यादीनुसार अनुक्रमांक चुकीचा असणे, या सर्व मुद्द्यांवर महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम १९६६ आणि नगराध्यक्षांच्या थेट निवडीसंबंधीच्या नियमांनुसार तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने थिटे यांचा अर्ज अमान्य असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!