इंदापूर: नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांची मोठी चुरस पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १४ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी १६९ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी रमेश ढगे यांनी दिली. राजकीय पक्षांनी उमेदवारांचा कार्ड गुलदस्त्यात ठेवल्याने, अखेरच्या दिवशी सोमवारी (दि.१७ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. नगराध्यक्ष पदासाठी केवळ चार अर्ज आधी दाखल झाले होते. मात्र शेवटच्या दिवशी अतिरिक्त दहा अर्ज दाखल झाले. त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी आधी झालेल्या ५८ अर्जांवर, अखेरच्या दिवशी एकूण संख्या १६९ वर पोहोचली.
दरम्यान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत प्रदीप गारटकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने, तसेच गारटकर यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत इंद्रेश्वर मंदिरापासून पदयात्रा काढण्यात आली.
हेही वाचा – इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले उमेदवार :
- महादेव सोमवंशी – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
- वसंत एकनाथ माळुंजकर – कृष्णा भीमा विकास आघाडी
- शरफिउद्दीन रफीक शेख – काँग्रेस
- पांडुरंग हरिभाऊ शिंदे – अपक्ष
- प्रदीप प्रभाकर गारटकर – कृष्णा भीमा विकास आघाडी (दोन अर्ज)
- सुरय्या जावीद शेख – अपक्ष
- शिवाजी वामन मखरे – अपक्ष
- अंकिता मुकुंद शहा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- भरत सुरेशदास शहा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- सम्राटसिंह सुधीर पोळ – अपक्ष


