Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय

इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय

इंदापूर :  आगामी इंदापूर नगरपालिका निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी कृष्णा–भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन करण्यात आल्याची घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत केली. ही पत्रकार परिषद इंदापूर येथील राधाई हॉलमध्ये भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

आघाडीला हिरवा कंदील

प्रवीण माने यांनी सांगितले की, इंदापूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सहभागातून त्रि-पक्षीय स्थानिक आघाडी उभारण्यात आली आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याशी चर्चा करण्यात आली. सर्वांनीच स्थानिक विकास आघाडीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – इंदापूर नगराध्यक्षपदासाठी भरत शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

माने पुढे म्हणाले, भाजपाकडे नगरपालिकेसाठी ३० नगरसेवक पदांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी ४ इच्छुकांचा पाठिंबा होता. पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्यास तयार होता, मात्र मतविभाजन टाळण्यासाठी आघाडीचा निर्णय घेण्यात आला. आघाडीच्या बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्यांच्या आणि इतर नेत्यांच्या संमतीने २० उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यकर्त्यांची उपस्थिती

दरम्यान, या पत्रकार परिषदेला भाजपाचे पक्षनिरीक्षक माऊली चवरे, मारुतराव वणवे, शहराध्यक्ष किरण गानबोटे, मयुरसिंह पाटील, सदानंद शिरदाळे, माऊली वाघमोडे, गजानन वाकसे, शितल साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!