Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात भरत शहांसह समर्थकांचा प्रवेश; प्रदीप गारटकर यांच्यावर साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात भरत शहांसह समर्थकांचा प्रवेश; प्रदीप गारटकर यांच्यावर साधला निशाणा

इंदापूर: स्थानिक स्वराज्य संसंथांच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात भरत शहा व त्यांच्या समर्थकांनी पक्षप्रवेश केला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात भरत शहा बोलत होते. पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, शहा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मुकुंद शहा, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, देवराज जाधव, बापू शेंडे, शकील सय्यद यांचेसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना भरत शहा म्हणाले, आम्ही पिढीजात श्रीमंत आहोत, पैसेवाले आहोत म्हणून मला पक्षप्रवेश करण्यापासून जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर अडवत होते. कारण पैसेवाल्यांना उमेदवारी द्यायची नाही, निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असे ते बोलत होते. त्यामुळेच माझा पक्षप्रवेश नाकारत होते. हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत असताना माझ्याकडे असलेल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षप्रवेश करण्याचे मी ठरवले. 2017 साली अंकिता शहा नगराध्यक्षा झाल्या. त्यानंतर इंदापूर शहर स्वच्छ केले म्हणून स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देशात इंदापूर नगरपरिषदेला प्रथम क्रमांक मिळाला. एवढे मोठे काम शहरात उभे राहिले.मध्यंतरीच्या काळात कोरोना महामारीने थैमान घातले होते. त्यावेळी स्वतः नगराध्यक्षा प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊन नागरिकांची काळजी घेतली. आमच्या कुटुंबाचे काम शहरवासीयांनी पाहिले आहे.‘, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरसोडी-कुगाव उजनी जलाशयातून पूल व्हावा अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने केली होती त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मान्यता देऊन 347 कोटी रुपयांचा निधी दिला. या पुलामुळे इंदापूरची बाजारपेठ विस्तारीत होणार आहे.भविष्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इंदापूरकरांना साथ मिळणार आहे. उर्वरित विकास होईल असा आशावाद शहा यांनी व्यक्त केला.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासाठी मी व उपमुख्यमंत्री अजित पवार उत्सुक होते. परंतु आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा नकार होता. त्यामुळे भरत शहा यांचा पक्षप्रवेश उशीरा करावा लागला. भरत शहा यांच्या नावाला शहरातील सर्व नागरिकांची पहिली पसंती आहे. शहराच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने देण्यात येईल अशी ग्वाही भरणे यांनी दिली.

इंदापूर शहराचे सिंगापूर असे काही मी करणार नाही, बारामती सारखा शहराचा विकास निश्चित पणे करणार असे ठामपणे सांगून हर्षवर्धन पाटील मंत्री असतानाच्या काळात दिलेल्या आश्वासनांचा मागावा घेत पाटील यांना टोला लगावला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!