Today शुक्रवार, 31st जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanjay Raut: सच्चा शिवसैनिक! थकवा, तोंडावर मास्क, आजाराने त्रस्त; तरीही संजय राऊत ‘शिवतीर्था’वर, बाळासाहेबांना वाहिली आदरांजली

Sanjay Raut: सच्चा शिवसैनिक! थकवा, तोंडावर मास्क, आजाराने त्रस्त; तरीही संजय राऊत ‘शिवतीर्था’वर, बाळासाहेबांना वाहिली आदरांजली

मुंबई: गंभीर आजारामुळे मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले. शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. तर, चालताना राऊत यांना त्रास होत असल्याचे दिसून आले.

शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळपासून शिवसैनिकांची गर्दी झाली होती. अशातच सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित होते. संजय राऊत हे आल्याचे समजताच शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या जिद्दीला सलाम केला. तर, राऊत यांनी देखील हात उंचावत त्यांचे अभिवादन स्वीकारले.

तोंडावर मास्क, चालताना त्रास

संजय राऊत हे सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी राऊत हे अनेक दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी तोंडावर मास्क घातला होता. मात्र, त्यांना चालताना त्रास होत असल्याचे दिसून आले.

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनी अभिवादन केले. ज्यांच्यामुळे मी घडलो, असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! असे संजय राऊत यांनी म्हटले. मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली ठरेल असेही राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!