Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गुजरातमध्ये अग्नितांडव! चालत्या रुग्णवाहिकेला आग; एका दिवसाच्या बाळासह 4 जण जिवंत जळून खाक

गुजरातमध्ये अग्नितांडव! चालत्या रुग्णवाहिकेला आग; एका दिवसाच्या बाळासह 4 जण जिवंत जळून खाक

Gujarat Ambulance Fire: गुजरातमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. अरावली जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका चालत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून एक दिवसाचे नवजात बाळ, त्याचे वडील, एक डॉक्टर आणि नर्स अशा चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना मोडासातील रणसायद चौकाजवळ घडली. अहमदाबादच्या ऑरेंज हॉस्पिटलची ही रुग्णवाहिका प्रसूतीनंतर गंभीर अवस्थेतील बाळाला पुढील उपचारांसाठी अहमदाबादला घेऊन जात होती. दरम्यान, मोडासातून जात असताना गाडीत अचानक आग भडकली. पुढच्या सीटवर बसलेला चालक आणि एक नातेवाईक हे कसाबसा बाहेर पडून वाचले. मात्र रुग्णवाहिकेचा मागील भाग काही क्षणांत जळून खाक झाल्याने डॉक्टर, नर्स, बाळाचे वडील आणि नवजात बाळ यांना बाहेर पडता आले नाही.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मोडासा महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रचंड प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. या भीषण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पेट्रोल पंपाजवळ रुग्णवाहिका जळत असल्याचे त्यात दिसते.

हेही वाचा –नवले पुलावर भीषण अपघात; दोन ट्रकला आग, कार अडकल्याने 7 जणांचा मृत्यू

घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नर्सची ओळख 22 वर्षीय भाविकाबेन रमनभाई मानत अशी झाली असून मृत डॉक्टराचे नाव राज शांतीलाल रेंटिया (35) आहे. दोघेही हिम्मतनगरजवळील चिथोरा गावातील रहिवासी असून अहमदाबादमधील एका रुग्णालयात कार्यरत होते. नवजात बाळही आगीतून सुटू शकले नाही. बाळाचे वडील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास स्थानिक पोलिसांनी सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी. मात्र अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

मोदासासारख्या शांत परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिक, मृतांच्या कुटुंबीयांपासून ते रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना मोठा धक्का बसला आहे. जीवन वाचवणारी रुग्णवाहिकाच मृत्यूचे कारण ठरल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उभे राहिले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!