Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नवले पुलावर भीषण अपघात; दोन ट्रकला आग, कार अडकल्याने 7 जणांचा मृत्यू

नवले पुलावर भीषण अपघात; दोन ट्रकला आग, कार अडकल्याने 7 जणांचा मृत्यू

पुणे: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन ट्रकने अचानक पेट घेतला. दोन ट्रकमध्ये एक कार अडकली असून यात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साताऱ्याच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या दोन्ही ट्रकचा अपघात झाला आणि यात एक कार अडकली होती. यावेळी दोन्ही ट्रकला आग लागली असून यात मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातामुळे नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अग्निशमन दलाकडून ट्रकला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवले पुलावरचा हा अपघात सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. दोन ट्रकच्या अपघातात मागच्या ट्रकचा चालक अद्यापही ट्रकमध्येच अडकला असल्याचे कळत आहे. सध्या या अपघातात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चारचाकी जी या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली होती, त्यामधील सर्वांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकचा ब्रेक फेल झालेला होता आणि त्या ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिली. मध्ये एक कार होती, त्यात 4-5 लोक होती, ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ट्रक चालक देखील ट्रकमध्येच अडकली असून त्यांना देखील आगीमुळे उतरता आले नाही. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मागे एक ट्रॅव्हलर होती, त्याला सुद्धा धडक देण्यात आली, त्यात 17-18 लोक होती. जवळपास 20-25 लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!